Wednesday, March 10, 2010
माझी व्यथा
रुसून निघून गेलेली...अजून राग गेला नव्हता तिचा....!
तसाच आवरून ऑफिसला आलो..
दिवस तसा शांतच होता
मन नकळत तिच्याशी संवाद साधू लागले...
तुझ्यापासून लांब राहतांना
जीव घाबरतो ग खूप..तुटतो..
हल्ली नेमक रात्र होण्याआधीच खूप अंधारून येतं
तो अंधार जीवघेणा असतो ग खूप..
वाटत त्या क्षणी तुझ्या कुशीत शिरून
अश्रूंना वाट करून द्यावी..
पण दार उघडायला घरी तू नाहीस...
हे लगेच मेदू कडून कळत...!
आलास? अरे मी फोनच करत होते तुला...
दमला आहेस का रे खूप...
बस जरा स्वस्थ..
का रे इतका त्रास करून घेतोस...?
आहे त्यात खुश आहोत ना आपण..?
हे..हे म्हणायला तू नाहीस ना घरी...!
लहान आहेस अजून... तू फक्त वयाने वाढलायस..
एकदम लहान मुलासारखो वागतोस...
पिल्लू म्हणून जवळ घ्यायचीस...
जेव्हा तू माझ्या केसातून हात फिरवून मला जवळ घ्यायची ना ...
तेव्हा कळायचे कि तूच प्रेयसी आहेस,
सखी आहेस आणि हो अनंतकाळची माता आहेस..!
तुझ्या कुशीत लहान मुल होताना
खूप छान वाटायचं ग...
आजही मी हेच म्हणेन
राणी मला समजून घे ग...!
मी सगळ्यांना वाटतो तसा
खूप मोठ्ठा वगैरे नाहीय
होऊ दे ना मला लहान
पुन्हा एकदा.....!
जगण्याच्या स्पर्धेत धावतोय मी सुद्धा
रेसचा भाग झालोय नकळत
पण हे सर्व तुझ्यासाठीच
माझ्या प्रेमाला सर्व सुख मिळावीत
ती तुझ्या समोर हात जोडून उभी रहावीत
आणि मी कौतुकाने बघत रहाव...
तुझ्या समाधानी चेहऱ्याकडे ...!
तुझ्या चेहर्यावर समाधान पहिले ना..
कि जगण्याचे सार्थक होते बघ...
होऊ दे रे कष्ट...राहूया आपण मस्त...!
कधीतरी तू "दमलेल्या बाबाची कहाणी"
आपल्या पिल्लूला सांगशील ना
सगळ्या कष्टाचं सार्थक होईल बघ तेव्हा...!
कॅबीनचे दार वाजले...
client आले होते ..
संवाद तुटला... पुन्हा न जुळण्यासाठी
ऑफिसच्या डेस्कटोपवर गाणे सुरु होते...
नसतेस घरी तू जेव्हा ..
जीव तुटका तुटका होतो..
जगण्याचे विरती धागे..
संसार फाटका होतो....!
संदीपने माझी व्यथा आधीच सांगून ठेवलेली....!
आठवणींचा पसारा
आज रविवार...
आणि मी घरी एकटाच
बसलो होतो नेहमीप्रमाणे
तुझ्या आठवणींचा पसारा मांडून.....
तुला माहितीय...
लहान मुलांची खेळण्याची एक पिशवी असते.
बसतात ते रोज पसारा मांडून खेळण्यांचा
कधीच कंटाळा येत नाही त्यांना....!
त्यात असतात सर्व खेळणी नवी, जुनी,
मोडकी तोडकी सुद्धा....
रंगीबिरंगी...काही हिरवी...
तर काही.... गुलाबी...!
आठ्वणींच सुद्धा असाच असते
आज बसलोय पुन्हा एकदा
तुझ्या आठवणींचा पसारा मांडून...
आता मोडल्या असल्या तरी...मोह सोडवत नाही...
किती आठवणी आहेत ग...
काहींना येतोय मातीचा सुगंध
नुकत्याच पडून गेलेल्या पावसासारखा..
आणि...आणि काहींना तुझ्या भिजलेल्या केसांचा...!
आठवत का ग तुला...
एकदा आंघोळीनंतर तुझ्या नकळत तुला कवेत घेतले...
'अरे, आई आल्या...' असे खोटेच सांगून पळालीस....
आंघोळीनंतरचे ते केसांवरचे पाणी आणि हो तुझा तो
वेडावणारा गंध..... छे छे .....किती आठवणी...!
तुझा कायमच असणारा संशयी स्वभाव
आपल्या स्वप्नांची पार राख करून गेला
आठवणींच्या पसार्यात या आठवणीसुद्धा....!
आईने दोन वेळा बोलावले...
'अरे काहीतरी..खाऊन घे...काय विचार करत बसलास...'
आठवणींचा पसारा सुदैवाने तिला दिसत नव्हता...
आणि हो तो माझा मलाच आवरायचा होता...
खर म्हणजे तुझ्या आठवणींशी खूप बोलायचं होत ग....!
तू अबोला धरल्यापासून....
हल्ली त्यांनाच बोलत कराव लागत....!
आणि त्यांनाच गच्च मीठी मारावी लागते...!
आठवणी कितीही असल्या
तरी आयुष्य थांबत नाही...
पुन्हा बाहेर पडलो.....
उरलेल्या आयुष्याशी लढायला......
वाटत हे क्षण का थांबत नाहीत......
......".ए जाते हुवे लम्हों...जरा ठहरो...जरा ठहरो...
मैं भी तो चलता हूँ.....जरा उनसे मिलता हूँ...
जो एक बात दिल में है.........उनसे कहूँ....
तो चलूँ...तो चलूँ...........तो चलूँ......!
Wednesday, March 3, 2010
येशील ना तेव्हा तुही
ये......पुन्हा एकदा
माझ्या कवितांना विषय देण्यासाठी
ये......पुन्हा एकदा
माझ्या जगण्याला आशय देण्यासाठी
मिलनाची स्वप्नं बघतो मी
तुजविन तुकड्यांत जगतो मी
ये...मला एकसंध करण्यासाठी
प्रेमात पुन्हा बेधुंद करण्यासाठी
उत्तरे न ज्यांची मजकडे
मन प्रश्न असे विचारू लागले
भावना घुसमटून गेल्या
शब्द आत गुदमरू लागले
ये...मला आझाद करण्यासाठी
प्रेमात पुन्हा बरबाद करण्यासाठी
कविता माझ्या रडू लागल्या
भावनांना मरण आलं
आगीत तुझ्या विरहाच्या
सारं काही जळून खाक झालं
जमतील सारे जेव्हा
चिता माझी रचण्यासाठी
येशील ना तेव्हा तुही
राख माझी वेचण्यासाठी
राख माझी वेचताना
जर तुला का रडू आलं
तर दोन थेंब तुझ्या अश्रूंचे
माझ्या राखेवरती गळू देत
मरण माझं वाया गेलं नाही
हे मलासुद्धा कळू देत
मिठीत
अस्तीत्व माझे या मुक्या शब्दांत होते.
तुझ्या नतंर काय माझ्या पुढ्यात होते
आठवणी मनात आणी अश्रु डोळ्यात होते.
धडपड्ताना वादळात शब्दांनीच मला सावरले
मला वणव्यात झोकंणारे ते तुझेच हात होते.
आजही या काळजांवर तुझेच घाव ओले
आणी त्या प्रत्येक घावावर तुझेच नाव होते.
आजही सारे माझ्या जखमांवर हसत होते
मी कसा हसु आभाळ माझ्या डोळ्यात होते.
तुझ्याशीवाय आता काय ह्या निर्जीव देहात
आत्म्याशीवाय जगणारे ते जिवतं प्रेत होते.
दुर राहून सा-यांनी पाहीला हा तमाशा
तु केलास घात माझा काय माझ्या नशीबात होते.
असेच दिवस जात होते स्मशान जवळ येत होते
आज जळताना कळाल जिवन माझ जळण्यात होते.
आसवांच्या जागी आता शब्द माझे गळू लागले
मला नाही मिळाल ते प्रेम शब्दांना मिळत होते.
तु नसलिस तरी आयुश्यात आज बरेच काही होते
शब्दांनी काही जिंकु शकतो प्रेमाने थोडेच काही होते.
एक होता विदुषक.......
खूप मेहनत करायचा,
लोकांचे दु:ख दूर करण्यास,
सदैव धडपडायचा.
एक होता विदुषक,
स्वता:चं दु:ख विसरायचा,
दूस-यांच्या दु:खांना,
आपलसं करायचा.
एक होता विदुषक,
कधीच नाहि रागवायचा,
लोकांच्या हिणवण्याला,
हसत हसत स्वीकारायचा.
एक होता विदुषक,
एकदा खूप दुखावला,
दु:खाचा सागर,
त्याच्यावर ओढवला.
लोकांना हसवणे,
त्याचे कमी झाले,
अन लोकांनीहि त्याच्याकडे जाणे,
हळू हळू बंद केले.
एक होता विदुषक,
एकटाच पडलेला,
ह्या स्वार्थी लोकांनी,
त्याला दु:खात ढकललेला.
खूप आक्रोश केला,
पण कोणी नाहि आले,
शेवटच्या घटका मोजताना,
त्याला जुने दिवस आठवले.
लोकांना हसवण्यासाठि,
जीवाचा आटापिटा करायचो,
इकडे-तिकडे भटकत,
पोटासाठि झगडायचो.
एक होता विदुषक,
असाच निघून गेला,
लोकांच्या मनात मात्र,
घर करून बसला.
एक होता विदुषक.......
भेट
दुख:शी भेट माझी आज तिथेच घडणार होती
आजचा दिवस सहज सरत होता
"अरे जरा दमानं" सांगितल तरी ऐकत नव्हता
तिला आज भेटुच नये असे वाटत होतं
मन माझं तिच्या निरोपाच्या
भयाने आतल्याआत तुटत होतं
पण पुन्हा तिचं ते मोहक रुप,
ते गहिरे डोळे मला दिसणार नव्हते
एकदाच शेवटच म्हणत
आज मन तिच्यासाथी हरणार होतं
कधी नव्हे ते आज पोहोचलो मी वेळेवर
नेहमी जिथे बसायचो बसलो
हात टेकवत त्या बाकावर
आज बागेतली गुलाबी फ़ुलं
मला काळी कुळकुळीत दिसत होती
पाखरांचे ते किलबीलणे मला विरह गाणी वाटत होती
अचानक बागेतलं वातावरण शांत झालं
"ही वादळापुर्वीची शांतत रे"!!
जणु मला इशा-याने सांगितल
हळु हळु काळे ढग जमु लागले
माझा हा विरह सोहळा पाहण्यास जणु ते आतुर झाले
तेवढ्यात ती आल्याची चाहुल लागली
तिने मला पाहताच लगबगीने पावलं टाकली
ती जवळ जवळ येत होती आणि पाऊशी सुरु झाला
सोबत त्याच्या विजाही कडाडु लागल्या
"आज तिच्या नजरेला नजर देउनच बोलणार"
मनात मी शपथ घेतली
पण ती समोर येताच माझ्याच
नजरेने माघार घेतली, नजर माझी भेदरली
ती शांत उभी होती
"उशीर का केलास"? मी विचारले
"अरे काम होतं जरासं!!" ती उत्तरली
बरं ठिक आहे म्हणत!! मी मान वळवली
का रे काय झाले ? तिने विचिरले
कुठे काय !! काही नाही ?
म्हणत मी तिच्या त्या प्रश्नाला टाळलं
"अछ्चा माझं लग्न ठरलय तो युएसए ला आहे"! तिने हसत सांगितल
माझं काय? मी झुरत विचारलं
अरे सॉरी घरातले तयार नव्ह्ते
मी तरी काय करु ?? सगळं गणितच चुकले
चल मी निघते म्हणत ती उठु लागली
पाठी न बघताच ती पुढे चालु लागली
नजर माझी तिच्या पाठमो-या
आकृतीकडे फ़क्त पाहत राहीली
हळु ह्ळु तिची ती आकॄती
माझ्या डोळयात फ़क्त भीजत राहीली
सोबत पावसाची सरही वाढु लागली
त्या पावसाच्या पाण्यात माझ्या
स्वप्नांची कागदी नाव बुडु लागली..
रंग
की त्याला स्वत:चा खरा रंग कळेना
त्याने खूप विचार केला तरी
तो कसा होता ते
त्याला काही केल्या आठवेना
तो म्हणाला,
"मी आकाशाला निळा वाटतो
मी गवताला हिरवा वाटतो
मी सर्वांना त्यांच्यासारखाच वाटतो
मी खरा कसा ते, कोणाला कळतं
वेगळा आहे ते कोणाला कळतं"
मग त्याने एकच रंग ठेवायचं ठरवलं
एकाच रंगाला त्याचा खरा रंग मानलं
गवतावरच नाही तर
मातीवर पण तो रहायला लागला हिरवा
त्याला काही खोडकर मुलांनी
मातीवर ओळखलं परवा
त्याला या खऱ्या रंगाने
त्याचा वेगळेपणा दाखवला
आणि या खऱ्या रंगामुळे
त्या मुलांनी त्याला दगड मारून संपवला
सरडा मेला तरी
लोकांना जिवनाचा नियम कळावा
चार-चौघात गेल्यावर आपण
त्यांच्याप्रमाणे रंग बदलावा
कितीही वाईट वाटलं तरी
आपला खरा रंग लपवावा
कारण हे जग वेगळेपणाला घातक मानतं
आणि मग स्वत:च घातक बनून
आपल्याला आपला रंग बदलायला लावतं