Wednesday, March 10, 2010

माझी व्यथा

उठायची इच्छाच नव्हती कारण...कारण ती घरात नव्हतीच मुळी...
रुसून निघून गेलेली...अजून राग गेला नव्हता तिचा....!

तसाच आवरून ऑफिसला आलो..
दिवस तसा शांतच होता
मन नकळत तिच्याशी संवाद साधू लागले...

तुझ्यापासून लांब राहतांना
जीव घाबरतो ग खूप..तुटतो..
हल्ली नेमक रात्र होण्याआधीच खूप अंधारून येतं
तो अंधार जीवघेणा असतो ग खूप..

वाटत त्या क्षणी तुझ्या कुशीत शिरून
अश्रूंना वाट करून द्यावी..
पण दार उघडायला घरी तू नाहीस...
हे लगेच मेदू कडून कळत...!

आलास? अरे मी फोनच करत होते तुला...
दमला आहेस का रे खूप...
बस जरा स्वस्थ..
का रे इतका त्रास करून घेतोस...
?
आहे त्यात खुश आहोत ना आपण..
?
हे..हे म्हणायला तू नाहीस ना घरी...!

लहान आहेस अजून... तू फक्त वयाने वाढलायस..
एकदम लहान मुलासारखो वागतोस...
पिल्लू म्हणून जवळ घ्यायचीस...

जेव्हा तू माझ्या केसातून हात फिरवून मला जवळ घ्यायची ना ...
तेव्हा कळायचे कि तूच प्रेयसी आहेस
,
सखी आहेस आणि हो अनंतकाळची माता आहेस..!

तुझ्या कुशीत लहान मुल होताना
खूप छान वाटायचं ग...
आजही मी हेच म्हणेन
राणी मला समजून घे ग...!

मी सगळ्यांना वाटतो तसा
खूप मोठ्ठा वगैरे नाहीय
होऊ दे ना मला लहान
पुन्हा एकदा.....!

जगण्याच्या स्पर्धेत धावतोय मी सुद्धा
रेसचा भाग झालोय नकळत
पण हे सर्व तुझ्यासाठीच
माझ्या प्रेमाला सर्व सुख मिळावीत
ती तुझ्या समोर हात जोडून उभी रहावीत
आणि मी कौतुकाने बघत रहाव...
तुझ्या समाधानी चेहऱ्याकडे ...!

तुझ्या चेहर्यावर समाधान पहिले ना..
कि जगण्याचे सार्थक होते बघ...
होऊ दे रे कष्ट...राहूया आपण मस्त...!

कधीतरी तू "दमलेल्या बाबाची कहाणी
"
आपल्या पिल्लूला सांगशील ना
सगळ्या कष्टाचं सार्थक होईल बघ तेव्हा...!

कॅबीनचे दार वाजले...
client आले होते ..
संवाद तुटला... पुन्हा न जुळण्यासाठी

ऑफिसच्या डेस्कटोपवर गाणे सुरु होते...

नसतेस घरी तू जेव्हा ..
जीव तुटका तुटका होतो..
जगण्याचे विरती धागे..
संसार फाटका होतो....!

संदीपने माझी व्यथा आधीच सांगून ठेवलेली....!