Wednesday, March 10, 2010

आठवणींचा पसारा

आज रविवार...
आणि मी घरी एकटाच
बसलो होतो नेहमीप्रमाणे
तुझ्या आठवणींचा पसारा मांडून.....

तुला माहितीय...
लहान मुलांची खेळण्याची एक पिशवी असते.
बसतात ते रोज पसारा मांडून खेळण्यांचा
कधीच कंटाळा येत नाही त्यांना....!

त्यात असतात सर्व खेळणी नवी, जुनी
,
मोडकी तोडकी सुद्धा....
रंगीबिरंगी...काही हिरवी...
तर काही.... गुलाबी...!

आठ्वणींच सुद्धा असाच असते
आज बसलोय पुन्हा एकदा
तुझ्या आठवणींचा पसारा मांडून...
आता मोडल्या असल्या तरी...मोह सोडवत नाही...

किती आठवणी आहेत ग...
काहींना येतोय मातीचा सुगंध
नुकत्याच पडून गेलेल्या पावसासारखा..
आणि...आणि काहींना तुझ्या भिजलेल्या केसांचा...!

आठवत का ग तुला...
एकदा आंघोळीनंतर तुझ्या नकळत तुला कवेत घेतले...
'अरे, आई आल्या...' असे खोटेच सांगून पळालीस....
आंघोळीनंतरचे ते केसांवरचे पाणी आणि हो तुझा तो
वेडावणारा गंध..... छे छे .....किती आठवणी...!

तुझा कायमच असणारा संशयी स्वभाव
आपल्या स्वप्नांची पार राख करून गेला
आठवणींच्या पसार्यात या आठवणीसुद्धा....!

आईने दोन वेळा बोलावले...
'अरे काहीतरी..खाऊन घे...काय विचार करत बसलास...
'
आठवणींचा पसारा सुदैवाने तिला दिसत नव्हता...
आणि हो तो माझा मलाच आवरायचा होता...

खर म्हणजे तुझ्या आठवणींशी खूप बोलायचं होत ग....!
तू अबोला धरल्यापासून....
हल्ली त्यांनाच बोलत कराव लागत....!
आणि त्यांनाच गच्च मीठी मारावी लागते...!

आठवणी कितीही असल्या
तरी आयुष्य थांबत नाही...
पुन्हा बाहेर पडलो.....
उरलेल्या आयुष्याशी लढायला......

वाटत हे क्षण का थांबत नाहीत......

......".ए जाते हुवे लम्हों...जरा ठहरो...जरा ठहरो...
मैं भी तो चलता हूँ.....जरा उनसे मिलता हूँ...
जो एक बात दिल में है.........उनसे कहूँ....
तो चलूँ...तो चलूँ...........तो चलूँ......!