Wednesday, March 10, 2010
माझी व्यथा
रुसून निघून गेलेली...अजून राग गेला नव्हता तिचा....!
तसाच आवरून ऑफिसला आलो..
दिवस तसा शांतच होता
मन नकळत तिच्याशी संवाद साधू लागले...
तुझ्यापासून लांब राहतांना
जीव घाबरतो ग खूप..तुटतो..
हल्ली नेमक रात्र होण्याआधीच खूप अंधारून येतं
तो अंधार जीवघेणा असतो ग खूप..
वाटत त्या क्षणी तुझ्या कुशीत शिरून
अश्रूंना वाट करून द्यावी..
पण दार उघडायला घरी तू नाहीस...
हे लगेच मेदू कडून कळत...!
आलास? अरे मी फोनच करत होते तुला...
दमला आहेस का रे खूप...
बस जरा स्वस्थ..
का रे इतका त्रास करून घेतोस...?
आहे त्यात खुश आहोत ना आपण..?
हे..हे म्हणायला तू नाहीस ना घरी...!
लहान आहेस अजून... तू फक्त वयाने वाढलायस..
एकदम लहान मुलासारखो वागतोस...
पिल्लू म्हणून जवळ घ्यायचीस...
जेव्हा तू माझ्या केसातून हात फिरवून मला जवळ घ्यायची ना ...
तेव्हा कळायचे कि तूच प्रेयसी आहेस,
सखी आहेस आणि हो अनंतकाळची माता आहेस..!
तुझ्या कुशीत लहान मुल होताना
खूप छान वाटायचं ग...
आजही मी हेच म्हणेन
राणी मला समजून घे ग...!
मी सगळ्यांना वाटतो तसा
खूप मोठ्ठा वगैरे नाहीय
होऊ दे ना मला लहान
पुन्हा एकदा.....!
जगण्याच्या स्पर्धेत धावतोय मी सुद्धा
रेसचा भाग झालोय नकळत
पण हे सर्व तुझ्यासाठीच
माझ्या प्रेमाला सर्व सुख मिळावीत
ती तुझ्या समोर हात जोडून उभी रहावीत
आणि मी कौतुकाने बघत रहाव...
तुझ्या समाधानी चेहऱ्याकडे ...!
तुझ्या चेहर्यावर समाधान पहिले ना..
कि जगण्याचे सार्थक होते बघ...
होऊ दे रे कष्ट...राहूया आपण मस्त...!
कधीतरी तू "दमलेल्या बाबाची कहाणी"
आपल्या पिल्लूला सांगशील ना
सगळ्या कष्टाचं सार्थक होईल बघ तेव्हा...!
कॅबीनचे दार वाजले...
client आले होते ..
संवाद तुटला... पुन्हा न जुळण्यासाठी
ऑफिसच्या डेस्कटोपवर गाणे सुरु होते...
नसतेस घरी तू जेव्हा ..
जीव तुटका तुटका होतो..
जगण्याचे विरती धागे..
संसार फाटका होतो....!
संदीपने माझी व्यथा आधीच सांगून ठेवलेली....!
आठवणींचा पसारा
आज रविवार...
आणि मी घरी एकटाच
बसलो होतो नेहमीप्रमाणे
तुझ्या आठवणींचा पसारा मांडून.....
तुला माहितीय...
लहान मुलांची खेळण्याची एक पिशवी असते.
बसतात ते रोज पसारा मांडून खेळण्यांचा
कधीच कंटाळा येत नाही त्यांना....!
त्यात असतात सर्व खेळणी नवी, जुनी,
मोडकी तोडकी सुद्धा....
रंगीबिरंगी...काही हिरवी...
तर काही.... गुलाबी...!
आठ्वणींच सुद्धा असाच असते
आज बसलोय पुन्हा एकदा
तुझ्या आठवणींचा पसारा मांडून...
आता मोडल्या असल्या तरी...मोह सोडवत नाही...
किती आठवणी आहेत ग...
काहींना येतोय मातीचा सुगंध
नुकत्याच पडून गेलेल्या पावसासारखा..
आणि...आणि काहींना तुझ्या भिजलेल्या केसांचा...!
आठवत का ग तुला...
एकदा आंघोळीनंतर तुझ्या नकळत तुला कवेत घेतले...
'अरे, आई आल्या...' असे खोटेच सांगून पळालीस....
आंघोळीनंतरचे ते केसांवरचे पाणी आणि हो तुझा तो
वेडावणारा गंध..... छे छे .....किती आठवणी...!
तुझा कायमच असणारा संशयी स्वभाव
आपल्या स्वप्नांची पार राख करून गेला
आठवणींच्या पसार्यात या आठवणीसुद्धा....!
आईने दोन वेळा बोलावले...
'अरे काहीतरी..खाऊन घे...काय विचार करत बसलास...'
आठवणींचा पसारा सुदैवाने तिला दिसत नव्हता...
आणि हो तो माझा मलाच आवरायचा होता...
खर म्हणजे तुझ्या आठवणींशी खूप बोलायचं होत ग....!
तू अबोला धरल्यापासून....
हल्ली त्यांनाच बोलत कराव लागत....!
आणि त्यांनाच गच्च मीठी मारावी लागते...!
आठवणी कितीही असल्या
तरी आयुष्य थांबत नाही...
पुन्हा बाहेर पडलो.....
उरलेल्या आयुष्याशी लढायला......
वाटत हे क्षण का थांबत नाहीत......
......".ए जाते हुवे लम्हों...जरा ठहरो...जरा ठहरो...
मैं भी तो चलता हूँ.....जरा उनसे मिलता हूँ...
जो एक बात दिल में है.........उनसे कहूँ....
तो चलूँ...तो चलूँ...........तो चलूँ......!
Wednesday, March 3, 2010
येशील ना तेव्हा तुही
ये......पुन्हा एकदा
माझ्या कवितांना विषय देण्यासाठी
ये......पुन्हा एकदा
माझ्या जगण्याला आशय देण्यासाठी
मिलनाची स्वप्नं बघतो मी
तुजविन तुकड्यांत जगतो मी
ये...मला एकसंध करण्यासाठी
प्रेमात पुन्हा बेधुंद करण्यासाठी
उत्तरे न ज्यांची मजकडे
मन प्रश्न असे विचारू लागले
भावना घुसमटून गेल्या
शब्द आत गुदमरू लागले
ये...मला आझाद करण्यासाठी
प्रेमात पुन्हा बरबाद करण्यासाठी
कविता माझ्या रडू लागल्या
भावनांना मरण आलं
आगीत तुझ्या विरहाच्या
सारं काही जळून खाक झालं
जमतील सारे जेव्हा
चिता माझी रचण्यासाठी
येशील ना तेव्हा तुही
राख माझी वेचण्यासाठी
राख माझी वेचताना
जर तुला का रडू आलं
तर दोन थेंब तुझ्या अश्रूंचे
माझ्या राखेवरती गळू देत
मरण माझं वाया गेलं नाही
हे मलासुद्धा कळू देत
मिठीत
अस्तीत्व माझे या मुक्या शब्दांत होते.
तुझ्या नतंर काय माझ्या पुढ्यात होते
आठवणी मनात आणी अश्रु डोळ्यात होते.
धडपड्ताना वादळात शब्दांनीच मला सावरले
मला वणव्यात झोकंणारे ते तुझेच हात होते.
आजही या काळजांवर तुझेच घाव ओले
आणी त्या प्रत्येक घावावर तुझेच नाव होते.
आजही सारे माझ्या जखमांवर हसत होते
मी कसा हसु आभाळ माझ्या डोळ्यात होते.
तुझ्याशीवाय आता काय ह्या निर्जीव देहात
आत्म्याशीवाय जगणारे ते जिवतं प्रेत होते.
दुर राहून सा-यांनी पाहीला हा तमाशा
तु केलास घात माझा काय माझ्या नशीबात होते.
असेच दिवस जात होते स्मशान जवळ येत होते
आज जळताना कळाल जिवन माझ जळण्यात होते.
आसवांच्या जागी आता शब्द माझे गळू लागले
मला नाही मिळाल ते प्रेम शब्दांना मिळत होते.
तु नसलिस तरी आयुश्यात आज बरेच काही होते
शब्दांनी काही जिंकु शकतो प्रेमाने थोडेच काही होते.
एक होता विदुषक.......
खूप मेहनत करायचा,
लोकांचे दु:ख दूर करण्यास,
सदैव धडपडायचा.
एक होता विदुषक,
स्वता:चं दु:ख विसरायचा,
दूस-यांच्या दु:खांना,
आपलसं करायचा.
एक होता विदुषक,
कधीच नाहि रागवायचा,
लोकांच्या हिणवण्याला,
हसत हसत स्वीकारायचा.
एक होता विदुषक,
एकदा खूप दुखावला,
दु:खाचा सागर,
त्याच्यावर ओढवला.
लोकांना हसवणे,
त्याचे कमी झाले,
अन लोकांनीहि त्याच्याकडे जाणे,
हळू हळू बंद केले.
एक होता विदुषक,
एकटाच पडलेला,
ह्या स्वार्थी लोकांनी,
त्याला दु:खात ढकललेला.
खूप आक्रोश केला,
पण कोणी नाहि आले,
शेवटच्या घटका मोजताना,
त्याला जुने दिवस आठवले.
लोकांना हसवण्यासाठि,
जीवाचा आटापिटा करायचो,
इकडे-तिकडे भटकत,
पोटासाठि झगडायचो.
एक होता विदुषक,
असाच निघून गेला,
लोकांच्या मनात मात्र,
घर करून बसला.
एक होता विदुषक.......
भेट
दुख:शी भेट माझी आज तिथेच घडणार होती
आजचा दिवस सहज सरत होता
"अरे जरा दमानं" सांगितल तरी ऐकत नव्हता
तिला आज भेटुच नये असे वाटत होतं
मन माझं तिच्या निरोपाच्या
भयाने आतल्याआत तुटत होतं
पण पुन्हा तिचं ते मोहक रुप,
ते गहिरे डोळे मला दिसणार नव्हते
एकदाच शेवटच म्हणत
आज मन तिच्यासाथी हरणार होतं
कधी नव्हे ते आज पोहोचलो मी वेळेवर
नेहमी जिथे बसायचो बसलो
हात टेकवत त्या बाकावर
आज बागेतली गुलाबी फ़ुलं
मला काळी कुळकुळीत दिसत होती
पाखरांचे ते किलबीलणे मला विरह गाणी वाटत होती
अचानक बागेतलं वातावरण शांत झालं
"ही वादळापुर्वीची शांतत रे"!!
जणु मला इशा-याने सांगितल
हळु हळु काळे ढग जमु लागले
माझा हा विरह सोहळा पाहण्यास जणु ते आतुर झाले
तेवढ्यात ती आल्याची चाहुल लागली
तिने मला पाहताच लगबगीने पावलं टाकली
ती जवळ जवळ येत होती आणि पाऊशी सुरु झाला
सोबत त्याच्या विजाही कडाडु लागल्या
"आज तिच्या नजरेला नजर देउनच बोलणार"
मनात मी शपथ घेतली
पण ती समोर येताच माझ्याच
नजरेने माघार घेतली, नजर माझी भेदरली
ती शांत उभी होती
"उशीर का केलास"? मी विचारले
"अरे काम होतं जरासं!!" ती उत्तरली
बरं ठिक आहे म्हणत!! मी मान वळवली
का रे काय झाले ? तिने विचिरले
कुठे काय !! काही नाही ?
म्हणत मी तिच्या त्या प्रश्नाला टाळलं
"अछ्चा माझं लग्न ठरलय तो युएसए ला आहे"! तिने हसत सांगितल
माझं काय? मी झुरत विचारलं
अरे सॉरी घरातले तयार नव्ह्ते
मी तरी काय करु ?? सगळं गणितच चुकले
चल मी निघते म्हणत ती उठु लागली
पाठी न बघताच ती पुढे चालु लागली
नजर माझी तिच्या पाठमो-या
आकृतीकडे फ़क्त पाहत राहीली
हळु ह्ळु तिची ती आकॄती
माझ्या डोळयात फ़क्त भीजत राहीली
सोबत पावसाची सरही वाढु लागली
त्या पावसाच्या पाण्यात माझ्या
स्वप्नांची कागदी नाव बुडु लागली..
रंग
की त्याला स्वत:चा खरा रंग कळेना
त्याने खूप विचार केला तरी
तो कसा होता ते
त्याला काही केल्या आठवेना
तो म्हणाला,
"मी आकाशाला निळा वाटतो
मी गवताला हिरवा वाटतो
मी सर्वांना त्यांच्यासारखाच वाटतो
मी खरा कसा ते, कोणाला कळतं
वेगळा आहे ते कोणाला कळतं"
मग त्याने एकच रंग ठेवायचं ठरवलं
एकाच रंगाला त्याचा खरा रंग मानलं
गवतावरच नाही तर
मातीवर पण तो रहायला लागला हिरवा
त्याला काही खोडकर मुलांनी
मातीवर ओळखलं परवा
त्याला या खऱ्या रंगाने
त्याचा वेगळेपणा दाखवला
आणि या खऱ्या रंगामुळे
त्या मुलांनी त्याला दगड मारून संपवला
सरडा मेला तरी
लोकांना जिवनाचा नियम कळावा
चार-चौघात गेल्यावर आपण
त्यांच्याप्रमाणे रंग बदलावा
कितीही वाईट वाटलं तरी
आपला खरा रंग लपवावा
कारण हे जग वेगळेपणाला घातक मानतं
आणि मग स्वत:च घातक बनून
आपल्याला आपला रंग बदलायला लावतं
एक डायरी
डायरीला त्या कोरी पाने तिनशे चौसष्ट
आणि एका पानावरती तू लिहीलेली
एक कविता
आजही जेव्हा आडरात्रीला दचकुन उठतो
उशास घेतो तुझी डायरी
आणि झोपतो, स्वप्नांमध्ये
वाचत वाचत
एक कविता
एक कविता
कोरी पाने
अन दृष्टीला पडली मळकी
कोरी तारीख
त्यावर केवळ दोनच
ओले सुकले थेंब
आज पुन्हा अन पुन्हा चाळली
कोरी पाने
अन चाळवल्या
जुन्या तारखा
जुन्या तारखा.
उभ्या होतात
समोर... चित्रासारख्या.
एक एक क्षण जिवंत
एक एक रेषा सजीव
हातावरच्या रेषा कधी निरखून नाही पाहिल्या
त्याही तशाच अस्पर्श राहिल्या असत्या
पण ....
जाऊ दे
डायरीतलं पुसता येत नाही
आणि हातावरचं उमटत नाही.
आणि विसरता....?
ख़ास तुझ्यासाठी......
चार पावलं आपण
सोबत चालत जाऊ
तुझे आणि माझे सूर
कुठवर जुळतात पाहु...
अर्थात जमत असेल तर चल
मी आग्रह करणार नाही
आज तरी, "तुला यावच लागेल,
असा हट्ट ही धरणार नाही
पण मनातल्या मनात कुढण्यापेक्षा
व्यक्त करणं बरं असतं
कारण इथून तिथून ऐकलेलं
सारंच काही खरं नसतं
कुणी कुणाला का आवडावं
हे सांगता येत नाही
चार चौघांना विचारून कुणी
हृदय देत नाही
तसंच काहीसं माझं झालं
त्याच धुंदीत propose केलं
जवळ अशी कधी नव्हतीसंच
propose ने आणखीच दूर नेलं
जे झालं ते वाईट झालं
पण झालं ते बरंच झालं
खरं सांगणं गुन्हा असतो
एव्हढं मात्र लक्षात आलं
जाऊ दे,
झालं गेलं विसरून जा
मागे न वळता चालत राहा
मला विसर असं मी म्हणणार नाही
पण तू तो प्रयत्न करून पाहा...
थांब...
इथून पुढं मला एकट्यालाच जायचंय
पण धन्यवाद; तू इथवर आलीस...
सारं आयुष्य नसलीस तरी
चार पावलं माझी झालीस....
एका बोक्याची डायरी
एका बोक्याची डायरी
आज रविवार. सर्वात बिझी दिवस.सकाळी सकाळी तीन ठिकाणी मासे खायला जावं लागलं.खुप धावपळ झाली.'काळ्या'ही लपत छपत मेजवानीला आला होता.मी कधीच पाहिलं होतं त्याला.पण
आज त्याच्याकडे लक्ष द्यायलाही मला वेळ नव्हता.कमीत कमी वेळात जास्तीत जास्त हादडायचं होतं ना ! जेवण मात्र अगदी फर्स्ट-क्लास होतं.पोट तुडुंब भरलं.मग समाधानाने पंजे चाटत पाण्याच्या टाकीवर लवंडलो आणि मस्तपैकी ताणून दिली.पण मध्येच कसल्याशा आवाजाने दचकून जाग आली.डोळे किलकिले करून बघितलं तर पहिल्या मजल्यावरची लठ्ठ बाई 'चुक-चुक' आवाज करून मलाच बोलावत होती.हातात एक अख्खी चपातीही दिसत होती.ही बाई कधी चपातीचा टीचभर तुकडाही खायला घालत नाही आणि आज एक अख्खी चपाती?नक्कीच चार-पाच दिवसांची शिळी असणार ! खुप आग्रह करत होती.पण लक्षच दिलं नाही.बस म्हणावं बोंबलत.कावळेही खाणार नाहीत ती.फुकट्ची झोपमोड मात्र झाली !
आज दिवसाची सुरुवात फारच खराब झाली.नेहमीसारखा फाटकापाशी सकाळची कोवळी उन्हं खात बसलो होतो.एवढयात पाठीमागून अप्पा कुलकर्णी आले आणि कंबरेत एक सणसणीत लाथ
घालून गेले ! वरुन अगदी शांत -सरळ दिसणारी माणसंही किती ' डेंजर' असू शकतात हे आज कळ
आज भल्या पहाटे बासुंदीचा वास नाकात शिरला. उठल्या उठल्या कोणी बासुंदी करायला घेत असेल असं वाटत नव्हतं.पण तरीसुध्दा खात्री करून घ्यावी.म्हणून वासाच्या अनुषंगाने शोध घेत घेत पुढे चाललो होतो तर वाटेत नेमका काळ्याच आडवा आला ! मग काय, गप्पकन मानगूटच धरली त्याची.तसा लागला गयावया करायला.मग आवाज जरा चढवूनच म्हणालो,''ए मच्छर,तुला दहा वेळा सांगितलंय ना मी की हा माझा एरिया आहे.इथे पाऊलसुध्दा टाकायचं नाही. तरीदेखील माझ्याशी पंगा घेतोस.थांब,तुझी धुलाईच करतो आता.'' असं म्हणताच काळ्याने सपशेल लोळणच घेतली पायांवर.मग मी पण थोडा विचार केला.काळ्याच्या धुलाईपेक्षा बासुंदीचा शोध घेणं जास्त महत्त्वाचं होतं.शिवाय काळ्याने स्वतःची हार मान्यही केली होती.म्हणून एक शेवटची वॊर्निंग देऊन त्याला सोडून दिलं.शेपूट खाली पाडून धूम पळाला बिचारा .अरे आपली वटच आहे तशी ! एवढयात मागच्या पायाजवळ काहीतरी जाड,काळसर आणि आणि केसाळ हलल्यासारखं वटलं.केवढयांदा दचकायला झालं ! पण पुढच्याच क्षणी कळलं की ती माझीच फुगलेली शेपूट आहे !!
दुपारी अचानक पाठीला खाज सुटली. थांबता थांबेना.शेवटी बाजूच्या मैदानात जाऊन गडाबडा लोळलो तेव्हा कुठे जरा बरं वाटलं.पण सगळं अंग धुळीनं माखलं.मग कठडयावर बसून निवांतपणे अंग चाटू लागलो.मनात विचार आला,''ही माणसं अंगं साफ न करता वर्षानुवर्ष कशी काय राहतात बुवा !'' वाटलं आताच जावं आणि एकेकाचं अंगं चाटून चाटून स्वच्छ करावं !
जोसेफ अंकल्च्या बंगल्यात गेला आठवडाभर साफसफाई चालू आहे.कुंडलीतलं झाड छान सजवलयं.पांढराशुभ्र कापूस,चमचमत्या चांदण्या आणि छोटयाशा सोनेरी घंटा प्रत्येक फांदीवर लावल्याने ते लहानसं झाड खूप छान दिसतंय. आज बंगल्यात काही अनोळखी माणसंही दिसत्यात.लहान मुलंही आहेत.सगळेजण अगदी आनंदात आहेत.जोसेफ अंकल खूप चांगले आहेत.नेहमी मासे खाऊ घालतात.ते नेहमीच आनंदात राहोत अशी देवाजवळ प्रार्थना केली.तेवढयात दोन छोटीशी मुलं जवळ आली आणि मझ्या डोक्यावरून,शेपटीवरून प्रेमाने हात फिरवू लागली.मीही खूश झालो आणि सुखाने डोळे मिटून घेतले.डोळे उघडले तेव्हा माझ्या गळ्यात एक सोनेरी घंटा लटकत होती !
आज जोसेफ अंकलनी एक 'सॊलीड' डिश खाऊ घातली. खमंग वासाचा,लुसलुशीत पदार्थ होता.रात्री समोरच्या सोसायटीतल्या मनीला विचारलं तेव्हा कुठे कळलं त्याला केक म्हणतात ते ! इतक्यात माझ्या गळ्यातली घंटा तिला दिसली.तशी हसता हसता पुरेवाट झाली तिची ! म्हणते कशी,''आता डोक्यावर एक टोपीही ठेव म्हणजे हुबेहूब 'सांताक्लॊज' दिसशील ! ''आता हा सांताक्लॊज कोण बुवा आणखीन?''मी बावळटासारखा प्रश्न केला !!
ता.क : अप्पा कुलकर्णी केळ्याच्या सालीवरून घसरून पडले.लंगडत लंगडत चालत होते.जगात देव आहे म्हणायचा !!!
पहाटे पहाटे कानात कोणीतरी शीरले काय या भितीने उठलो पाहतो काय शेजारी खोतांचा मुलगा माझ्या कानात केरसूणी घालून मला हाकलत होता.हा मुलगा मला कालपर्यंत दुध आणि पाव खाउ घालून माझेच अंग घुसळून काढायचा तेव्हा माझ्या डोक्यावर प्रश्नचीन्ह आलेलं मी जाणवलेलं कारण यांना इतके उबदार घरे असताना हे इथे गच्चीत का बरे कलंडतात? म्हणून मी हुशार मेघाला व चुणचुणीत मनीला बोलावून आणले तेव्हा मला समजले की आत्ता या मुलांची परीक्षा चालू आहे. घरात त्याची मोठ्ठा आंबाडा घालणारी आणि कुंकूवाचा गोल लावणारी आई तोंडाचा पट्टा चालवत असते.म्हणून अभ्यासाला तो आणि चाळीतली सर्व मुले इथे चटया घेऊन अभ्यासाला येतात.मी आणि मनी उगाचचं पप्याच्या पाठीला अंग घासून त्याचा सदरा मळवत होतो.मघाच्या केरसूणीचा मेघाने चाउन चाउन चांगलाच फडशा पाडला होता.मला डांबिस म्हणणारा दर्श्या आज अभ्यासाच्या नादात दोनदा शेपटीवर पाय देता बचावला.बाकी आपलं जिणं काही या लोकांसारखं तडजोड करण्यात वाया न घालवता मी आजचा दिवस याच्या मांडीवर तर कधी त्याच्या मांडीवर संपवला.दिवस संपता संपता दर्श्याने दोनदा माझा उशी म्हणून वापर केला.म्हणजे त्याला किती मार्क मिळतील हे मी आज सांगू शकीन.
काही उंदरांना मी मुद्दामहून अभय दिले आहे.दुष्काळ प्रसंगी असे खाद्य नेहमी उपयोगी पडते.आत्ता माझ्या नाकासमोर माझ्यापेक्षा जास्त आत्मविश्वासाने उभे राहण्याइतकी त्यांची मजल जाते.त्यांची दादागीरी मी अनेक रात्री सहन करूनही गप्प आहे.नाडकर्ण्यांकडचा लठ्ठ उंदीर मी कित्येकदा कंटाळा आला होता किंवा सहानुभुती म्हणून खाल्ला नव्हता.त्याला मी त्याच्या आईच्या पोटात असल्यापासुन पाहत आलोय.दोन दिवाळ्या त्याने नाडकर्ण्यांच्या करंज्या चाखल्या आहेत एव्हाना ! सुरवातीला फारच लपत छपत पाहायचा मला.पण आज हे सर्व भारी पडलं मला.मघाशीच 'काळ्या' त्याला मटकावत मटकावत शांत चीत्ताने चालत जाताना पाहीले आणि पश्चाताप झाला.खोतांकडची घूस लाजून घाबरते म्हणून मी तीच्या वाटेला जायला घाबरतो.बाकी या कावळ्यांनी मात्र उच्छाद मांडलाय नुसता.माझी शेपटी हे खेळण्याचं साहित्य आहे असेच ते समजतात.'काळ्या'मुळे आज नावडती डीश खावी लागली.रोज ज्या प्रमाणे मी मीशा चाटून स्वतःला गावचा सरपंच समजतो तसा आज 'काळ्या' मीशा चाटत होता.आज मी फक्त कौलावर जाउन उद्याचा बंदोबस्त करणार आहे हे कावळ्यांना कोणी सांगीतले कुणास ठाउक ?
अशा वेळी
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
परक्यांपेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग्
नजरे आडून वार होतात
भळभळणा-या जखमेतून
विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
आपणच पुसायचं असतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
आपलं सुःख पाहण्याचा तसा
प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं
हा कुठला न्याय आहे...
माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं
जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं...
मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं
मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच त्याला आवरायचं
अशावेळी....
आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
Tuesday, March 2, 2010
नास्तिक
नास्तिक
एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा खर तर गाभा-यातच भर पडत असते
की कोणीतरी आपल्यापुरता सत्याशी का होईना,
पण प्रामाणिकपणे चिकटुन राहिल्याच्या पुण्याईची !
एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा होते निर्माण
देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची !
एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा को-या नजरेने पाहत राहतो
सभोवतालच्या हालचाली, भाविकाच्या जत्रा...
कोणीतरी स्वत:चे ओझे , स्वत:च्याच पायावर
साभाळत असल्याचे समाधान लाभते देवलाच !
म्हणून तर एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदचित !
पण मिळते आकठ समाधान एक सहकारी लाभल्याचे
देऊळ बद झाल्यावर एक मस्त आळस देउन
बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता
देव म्हणतो, " दर्शन देत जा अधुन मधुन........
तुमचा नसेल विश्वास आमच्यावर,
पण आमचा तर आहे ना ! "
देवळाबाहेर थाबलेला एक खरा खुरा नास्तिक
कटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारिने पाठवतो देवळात
तेव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन
अस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे....
एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो............ ..
आपण
आपण . . . .
अधराचे शब्द ऐकत
"हा आपला" असे स्वत:लाच समजावत
रात्रभर उराशी बसणारा एखादा जिवलग....?
असं म्हणत-म्हणत डोळ्यातील बाहूल्यांशी
संवाद साधू बघणारे एखादे प्रौढ़ बालक....?
आपण एखाद्यासाठी कितपत असतो ?
एखाद्याच्या इछेभोवती पडलेच आपल्या नकाराचे कुंपण
तर स्मरणात राहतो का "जिवलग" शब्दाचा खोल अर्थ ?
का आपण असतो त्याच्यासाठी गोड गोड गाणारा बंदिस्त पक्षी...
जेव्हा जेव्हा चोच उघडेल तेव्हा तेव्हा मंजूळ आणि मंजूळच आवाज काढणारा ?
आपण एखाद्यासाठी कोण असू...?
पाखरांना पंख फुटतील, दिशा समजतील
आणि कळतील झाड़ सोडून जाण्याच्या आवश्यकता....
आपण असू जागा न सोडू शकणारे झाड़ !!!
भरारीच्या आवेगात पक्षी फिरकलाच कधी परत
तर त्याच्या आठवणीच्या दु:खाचे चोचले पूरवणारे झाड़ !
आपण एखाद्यासाठी कोण होतो....?
भेटलो नसतो असे कोणीतरी...?
आपण एखाद्यासाठी कोण असतो..?
ज्याच्यावाचून अड़त नाही असे आगंतुक सहावे बोट...?
आपण एखाद्यासाठी कोण असू...?
कधी लहर आलीच तर अश्रू पूरवणारे एखादे कारण...?
पण आपण फार तर फार पाणी होऊ शकतो एखाद्यासाठी....
एखाद्याची तहान होऊ शकत नाही......
प्रेम
एका डॉक्टरांकडे एक ८०-८५ वर्षांचे म्हातारे गृहस्थ आपल्या जखमेचे टाके काढून घ्यायला गेले. सकाळी ८.३० चा सुमार. ते डॉक्टरांना म्हणाले, थोडं लवकर होईल का काम? मला ९ वाजता एकीकडे जायचंय. डॉक्टरांसमोर त्या क्षणी काहीच काम नव्हतं. त्यांनी जखम तपासली, सामानाची जमवाजमव केली आणि टाके काढायची तयारी केली. दरम्यान, ते त्या गृहस्थाशी गप्पा मारत होते.
""आजोबा, ९ वाजता दुसऱ्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे का?''
""नाही! मला ९ वाजता माझ्या बायकोबरोबर नाश्ता करायला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायचंय.''
""हॉस्पिटलमध्ये? आजारी आहेत का त्या?''
""हो! गेली पाच वर्षे हॉस्पिटलमध्येच आहे ती.''
""अच्छा! आणि तुम्ही वेळेवर गेला नाहीत, तर वाट पाहतील ना त्या? काळजीही करतील...?''
""नाही डॉक्टर. तिला "अल्झायमर्स' झालाय. ती गेली पाच वर्षे कोणालाच ओळखत नाही.'' आजोबा शांतपणे म्हणाले.
डॉक्टर चकित होऊन म्हणाले, ""आणि तरीही तुम्ही रोज त्यांच्याबरोबर नाश्ता करायला इतक्या वेळेवर आणि धडपडून जाता? त्या तुम्हाला ओळखतही नसताना?''
त्यावर पुनः तितक्याच शांतपणे म्हातारे गृहस्थ म्हणाले, ""डॉक्टर ती मला ओळखत नसली, तरी मी तिला गेली कित्येक वर्षे ओळखतो. माझी बायको आहे ती, आणि माझं जिवापाड प्रेम आहे तिच्यावर.''
ऐकता ऐकता डॉक्टरांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. गळा दाटून आला. त्यांच्या मनात आलं, ""हे खरं प्रेम; प्रमे म्हणजे काही नुसतं घेणं नव्हे, तर त्याबरोबर कितीतरी देणं, निरपेक्षपणे स्वतःकडचा आनंद लुटवणं, उधळणं - त्या गृहस्थांसारखं.''
अचानक इंटरनेटवरून आलेल्या अनेक संदेशांमधला एक संदेश डॉक्टरांना आठवला-
""चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहेमीच सगळं सर्वोत्तम येतं असं नाही - पण जे वाट्याला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरं करतात.''
यालाच आयुष्य म्हणायचं. आपल्या माणसाला आहे तसं स्वीकारणं आणि आपल्या दोन्ही हातांनी, आपल्या सर्वस्वाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं....
खरंच मिळेल असं प्रेम आपल्याला अन् जमेल का असं प्रेम करणं आपल्याला?...
तेव्हा आले सगळे बघायला,
नव्हत कोणी डोकावून बघायला,
आज जेव्हा श्वासच उरला नाही,
तेव्हा आले सगळे बघायला,
नव्हत कोणी रडायला माझ्याबरोबर,
तेव्हा, नव्हत कोणी हसायला,
आज जेव्हा शांतपणे झोपलोय मुक्त होऊन,
तर, आले सगळे टाहो फोडायला,
आज पहा माझा काय थाट!
लोक जमतील मला अंघोळ घालायला,
आयुष्यभर नाही पाहिल कधी कापड,
आज नवीन पांढरे-शुभ्र वस्त्र मला नेसायला,
जेव्हा उपाशी होतो रात्रों-रात्र,
नव्हत कोणी एक घास खाऊ घालायला,
आज जेव्हा भुक मेली माझ्याच बरोबर माझी,
ठेवलाय माझ्यासाठी त्यांनी भात शिजायला,
जन्मभर लाथा मारून गेले जे मला,
आज आले माझ्या पाया पडायला,
शब्दाचाही आधार नाही दिला ज्यांनी,
आज चौघे-चौघे आले मला धरायला,
आज काय किम्मत 'त्या' रडण्याला?,
आज काय किम्मत 'त्या' छाताड झोडण्याला?,
ज्या घरात रहातच नाही आज कोणी,
आज काय किम्मत 'ती' घरपूजा करण्याला?
To..........
तो कविता वाचत होता.
"गप रे" ति वैतगली होति.
जरा सिरीयस बन. २ वर्षे झालीत..
बाबा मागे लागलेत लग्नासाठी..
माझा हो कळव.. तो हसत म्हणाला..
अन काय कळवणार? तुला ना नोकरी,
ना काहि व्यवसाय. अरे लग्न म्हणजे गंमत नाहि.
अग गंमतच आहे. लग्न म्हणजे सहजिवन, प्रेम,
एक मेकात आडकण.लग्न म्हणजे संलग्न.
वेडा आहेस. अरे लग्न म्हणजे संसार,
म्हणजे घर, दुध, किराणा, मुल, म्हणजे पैसा..ति म्हणाली
हातात हात तुझा, अन तुझी साथ. पैसा येइल. येतो. तो म्हणाला
पैसा म्हणजे परसातल प्राजक्ताच झाड नाहि.
हालवल कि फुलांनी आंगण भरुन जात..तिन फटकारल..
अग पण, तो बोलायच्या आतच ति म्हणाली..
पैसा कि प्रेम हा वाद विवाद कालबाह्य आहे..
प्रेमाच्या जागी प्रेम आहे, अन पैसा त्याच्या जागि.
तु मल खुप आवडतोस.. पण तु मला विचार करुन निर्णय दे.
तिन अल्टिमेटम दिला..
१५ ऑगस्ट चा दिवस होता आज खिशात पैसे होते.
दिवस तिच्या बरोबर मजेत घालवायचा होता.
त्यान तिला फोन केला.बर झाल, फोन केलास,
मला पण तुझ्याशी बोलायच आहे.ति म्हणाली.
नो प्रोब्लेम.. ताज मधे भेटु. काय?.. ति उडालीच.
ताज च्या थंडगार वातावरणात, ति सुखावलि होति.
मग काय ठरल?.तिन विषयाला हात घातला.
तो बोलतच नव्हता. मी थांबु शकत नाहि.
हि आपली शेवटची भेट.. तिच्या बोलण्याला धार होति..
तो आतुन तुटत चालला होता..प्लिज..
अरे प्लिज काय? सारच कठीण आहे.ति म्हणाली.
मी निघते? ..प्लीज थांब, मला एक संधी दे..तो म्हणाला.
तु फक्त एक वर्ष दे मला, तुल पाहिजे तेवढा पैसा देतो…तो म्हणाला.
ति खळखळुन हसली." वेडा रे"अरे पैसा म्हणजे?…
आय नो.. त्यान वाक्य तोडल."किति पैसे लागतात संसाराला?
लाखो रुपये ति म्हणाली..ठीक आहे. एक डिल.तो म्हणाला.
आपण पुढच्या १५ ऑगस्ट ला आपण इथच, ताज मधे,संध्याकाळी. ७ ला भेटु.
अन काय करु..तिन विचारल..
मी त्या दिवशी तुझ्या पायावर ७५ लाख रुपये ओतिल…तुला संसारा साठी.
त्या चित्रपटांत हिरो हिरॉइन ला नोटांनी अंघोळ घालतो तशी.अंघोळ घालीन…
तो हसत म्हणाला."मॅड आहेस." पण म्हणुनच तु मला आवडतो.ति..
पण वचन दे, वाट पहाशील म्हणुन.. तो म्हणाला.
ठिक आहे, पण ७५ रुपये तरी आणशील अस वाटत नाहि. ति हासली. …..
continue…..
ठिक आहे, पण ७५ रुपये तरी आणशील अस वाटत नाहि. ति हासली.
१५ ऑगस्ट.. तो तिचि ६ वाज ल्या पासुनच वाट पहात होता.
तेच टेबल होत, मागच्या वर्षीच, ति येइल? तो अस्वस्थ होता
७ वाजायला आले होते, अन तेवढ्यात ति आत येताना दिसली.
तिच्याशी नजरानजर होतच त्यान हात हलवला.
हाश हूश करत ति समोरच्या खुर्चीवर बसली.
कशी आहेस? फार गरम होत आहे. पहिल पाणी पिते.
म्हणत उठुन ति त्याच्या समोरच्या ग्लास घ्यायल वाकली.
ति वाकली असताना, त्याला ब्लाउज मधे लपवलेल्या मंगळसुत्रचा पदर दिसला.
अग मी मागवतो म्हणेपर्यंत तिन ग्लास तोंन्डाला लावला होता.
अरे फार पाणी पाणी झाल होत.. हं आता बोल.
काय बोलु? तुच सांग. तिच्याकड बघत तो म्हणाला.
मग काय? कुठे आहे ७५ लाख? ति हसत म्हणाली..
त्याचा चेहेरा पड्ला होता., नाहि जमल, तु म्हणालीच तेच खर.
७५ लाख काय ७५ रु जमले नाहि. पैसा मिळवण कठिण आहे..
जाउ देत, मला माहित होत, ति समजावणीच्या स्वरांत म्हणाली.
मल पण तसच वाटत होते. पण म्ह्टल तुला शब्द दिला होता…
तो बघत होता..अजुन काय? पडलेल्या चेहे~यानि तो म्हणाला.
सांगु ति म्हणालि.. अरे माझ लग्न झाल, घरचे मागे लगलेच होते.
तो बॅन्केत आहे, १ बेडरुम च घर आहे… तुझ अस.. ति म्हणाली. सॉरी..
तुझ खर आहे., तु ठीकच केल, माझ्याबरोबर…. वायाच गेल असत.
तो म्हणाला.. ठीक आहे. मी निघते, तुला आता अस भेटण बर नाहि…ति.
बरोबर आहे. निघते.. ति म्हणाली.. तो तिच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता..
तो बराच वेळ तो बसुन होता. सार संपल होत.
रुम च्या नोकरानि टॅक्सीत सामान भरल..
सर कुठे? टॅक्सी ड्रायव्हर ने विचारले.
सहारा एयर पोर्ट. ईंटर नॅशनल टर्मीनल.
टॅक्सी वेगात चालली होति,
गार हवेच्या सपक्यान डोक शांत होत होत.
विमान तळावर टॅक्सी थांबली,
त्यान ट्रॉलीत लगेज भरल.व भाड देवुन तो निघाला,
सर,टॅक्सी ड्रायव्हर ने हाक मारली,
सर, तुमची बॅग राहिली आहे,
त्यान टॅक्सी ड्रायव्हर कड बघितल, अन म्हणाला
बॅग तुला राहु देत, त्यात ७५ लाख रुपये आहेत.
नाहितरी, मला आता त्याचा काहिच उपयोग नाहि,
ड्रायव्हर बराच वेळ त्याच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता
बघ ‘राज साहेबांची’ आठवण येते का?
आज ओफीसातून जरा लवकर निघ
७.१२ च्या लोकल ची मुद्दामहून विंडो सीट पकड.
घरी जायची ओढ असेल,
पण तू घाई करू नकोस.
वी.टी ते ठाणे जरा ट्रॅक च्या बाजूची बकाल झोपडपट्टी बघ,
बघ ‘राज साहेबांची’ आठवण येते का?
दरम्यान जरा डब्यातले संवाद ऐक,
सगळे हिंदीतून बोलत असतील.
तुझे मित्र,सगे, आप्त् पण.
त्याला आक्षेप घे.
तुझ्या समोर बसलेला उर्मट भैय्या तुझी खिल्ली उडवेल
आणि सारा डब्बा तुझ्यावर फिदी फिदी हसेल.
तेव्हा तुझ्या हाताच्या आवळलेल्या मुठी कडे बघ
बघ ‘राजसाहेबांची’ आठवण येते का?
ठाणे स्टेशन ला उतर, थोडा १ नंबर वरुन बाहेर ये
रस्त्याच्या कडेला, फूटपाथ वर अनेक सी.डी चे स्टॉल दिसतील
साहजिकच ते भैय्यांचे असतील.
त्यातल्या त्यात जरा व्यवस्थित दिसणार्या भैय्या कडे जा,
हळू आवाजात त्याला विचार ब्लू प्रिंट आहे का?
तो बिनधास्तपणे मोठ्याने बोलेल,
“साब अंग्रेजी दु के देसी? मराठी वाली लाने का भी सोच रहे है”
तुझ्या तोंडात शिवी येईल, पण बाहेर पडणार नाही.
बाहेर पडायची असेल तर…………………….
बघ राज साहेबांची आठवण येते का?
तिथे तुला एक तरुण दिसेल,
फुटपाठवरच्या फेरीवल्याना न्याहाळताना.
त्याच्या जवळ जा, त्याला विचार,”मित्रा काय झाल?”
हो! हो तो मराठीत बोलेल,
“काल शर्ट विकत घेतला ब्रॅण्डेड म्हणून पण फटका निघाला.”
फेरीवाल्याला शोधायचा प्रयत्न करू नकोस.
त्याला घरी जायला सांग,तू पण निघ.
पण निघण्या आधी त्या तुटपुंजया पगार घेणार्या मराठी तरुणाच्या
डोळ्यात बघायला विसरू नकोस
बघ, बघ ‘राजसाहेबांची’ आठवण येते का?
सुन्न डोक्याने घरी जा,
उशीर झाला म्हणून बायको आधीच चिंतेत असेल.
फ्रेश हो, जेवण कर.टी.वी बघायची ईछा नसेलच.
बायकोला जरा जवळ घे,तिची चौकशी कर.
प्रॉब्लेम्स ती स्वतःच सांगेल.
आता ती तुझ्या केसात हळूवार बोट फिरवेल
म्हणेल, येत्या खर्चाला १००० रुपये जास्त देशील का?
दूध वाला भैय्या, भाजी वाला भैय्या, इस्त्रि वाला भैय्या,
वॉचमन भैय्या, लिफ्ट वाला भैय्या, झालच तर मूलाना शाळेत सोडणारा रिक्षा वाला भैय्या
यानी जरा पैसे वाढवलेत.
ती तुझी परिस्तिथि समजेल
ताबडतोब ती चेहरा फिरवून निघून जाईल.
तिच्या पाठमोरया आकृती कडे बघ,
म्हण “हो १००० काय २००० देतो”
पण तिला सांगू नकोस तुझ प्रमोशन आहे ते.
तिच्या त्या भैय्या खर्चा कडे बघ.
बघ ‘राजसाहेबांची’ आठवण येते का?
आज तू खुश असशिल
आज तुझ प्रमोशन असेल.
किती वाढणार याची आकडेमोड
काळ झोपेतच झाली असेल.
ठरल्या प्रमाणे सर्व काही होईल,
एक एक करता तुझा नंबर येईल.
बॉस तुला लेटर देईल ,
ते नीट बघ!
प्रमोशन चे नाही ‘टर्मिनेशन’ चे असेल ते.
त्याला काही विचारू नकोस,उलट तोच सांगेल.
“MR पाटील आता आम्हाला MR सिंह भेटलाय,
तुमच्या पेक्षा जास्त वेळ थांबणारा,
आणि तो ही अर्ध्या पगारात.
मराठी येत नाही म्हणून काय झाल?
हिंदी ‘न चुका’ करता येत”
काही बोलू नकोस,
तुझ्या समोर बॉस चा टेबल असेल.
त्याच्या वर एक पपेरवेट ठेवला असेल.
त्याच्या कडे निरखून बघ
बघ,बघ ‘राजसाहेबांची ‘ आठवण येते का?
Mail Friend
पहिला मुलगा . वयाने लहान पण मनाने आणि बुद्धीने खूप मोठा होता
. त्याच्याशी बोलताना परकेपणा कधीच वाटला नाही . नेहमी तो माझ्या
जवळचा वाटायचा .कधी कधी तर अस वाटायचं कि विवेक ऐवजी हाच जर
माझ्या आयुष्यात आला असता तर .…..पण म्हणतात ना नियतीने
सर्वांच्या गाठी बांधलेल्या असतात तसच काही झाल असाव . त्याचा
फोटो मागूनही त्याने कधी पाठवला नाही , तो नेहमी म्हणायचं कि
माणसाची प्रतिमा त्याच्या बोलण्यातून प्रकट होते . अस समाज कि तू
आंधळी आहेस आणि तुला एक शिल्पकृती बनवायची आहे . मी खूप
प्रयत्न केला त्याची प्रतिकृती बनवण्याचा पण मनासारखी जमलीच
नाही . एका एकदम सामान्य मुलाची मुर्त्य माझ्या हातून घडली . अस
वाटलं त्याच्या चेहऱ्यातून मुख्यतः त्याच्या डोळ्यातून त्याच्या
मनातले सराव भाव प्रकट होतात . जणू काही त्याचे डोळेच माझ्याशी
मूक संवाद साधत आहेत . एकदा त्याने phone केला आणि माझ्या
आवडीचे colour विचारले , मी तपकिरी आणि cream colour सांगितले .
त्याने त्या दिवशी तपकिरी colourcha shirt आणि cream colourchi
pant घेतली . मग माझ्या मनातल्या आकृतीलाही मी तेच वस्त्र चढवले
. खूप गोड दिसत होता तो . कधी motor cycle वर बसून मला
फिरवताना ,कधी पावसाच्या सारींपासून एकाच छत्रीतून स्वतःचा बचाव
करताना दिसायचा . त्याच्याबरोबर फिरताना अस वाटायचं कि हा प्रवास
कधीच संपू नये . आणि लवकर तो सत्यात उतरावा .
1 ऑक्टोबरला माझ्या वाढदिवसाला chating तिंग वरून
celebrate केलेला तो वाढदिवस मी कधीच विसरू शकत नाही . ज्या
अपेक्षा मी विवेक कडून केल्या होत्या त्या सर्व त्याने पूर्ण
केल्या . माझ्याकडून कशाचीही अपेक्षा न करता ……! कस जमत रे तुला
हे . माझा नवरासुद्धा काही न काही तर शारीरिक सुखाची अपेक्षा
करतो , पण तू मात्र फक्त देत गेलास अमाप सुख , ज्यात मी
पूर्णपणे न्हाऊन निघाले .
Orkut मधाळ तुझ नाव …..मनापासून ! तुझ प्रोफिले खूप
आवडल आणि तुला मैत्रीसाठी विचारलं . वाटलं होत सर्व मुलांप्रमाणे
तुही बोलशील काय करतेस ? नाव काय ? राहायला कुठे ? BF आहे का ?
फोन no.दे . पण तू यातला एकही प्रश्न विचारला नाहीस . तुझा
पहिलाच प्रश्न मनाला स्पर्शून गेला कधी कुणावर प्रेम केल आहेस
का ? या प्रश्नाने माझ्या आयुष्याच्या पुस्तकातली सर्व पाने
उलगडली गेली . पण खूप विचारांती ठरवलं कि इतक्या लवकर याला काही
सांगायचं नाही . स्वतःची personal life अशी कुणाबरोबर शहरे करायची
नाही . मी तुला काहीच नाही सांगितलं . घरी आई ,वडील आणि भाउ
यांच्याबरोबर राहते . स्वतःची separate room आहे ,कॉम्पुटर
engineering करते सर्व खोट सांगितलं . तास न तास तुझ्याशी chating
करायचे पण तुला काही खर सांगितलं नाही . तीन दिवसांच्या
बोलण्याने तू मला पूर्ण जिंकलास . अशा स्वभावाचा मुलगा मी
आजपर्यंत कधी बघितला नव्हता . तुझ्याशी chatting करताना रोहन , राज
यांच्याशीही बोलायचे पण त्यांच बोलन आणि तुझ बोलन यात कितीतरी
फरक hota . जगापेक्षा कितीतरी वेगळा होतास . तुला फसवण मला जमलाच
नाही रे . काय अशी जादू केलीस कोण जाणे पण चौथ्या दिवशी
ठरवलं तुला सर्व काही खर सांगायचं . तसा scrap तुला केला , माझ
लग्न होऊन 3 वर्ष झालेत . मी माझ्या नवरयाबरोबर देल्हीला राहते .
हे सर्व ऐकून तू माझ्याशी मैत्री ठेवणार नाहीस , नको ठेउस , bye.
एवढाच scrap होता तो . पण तुही तितकाच शांत reply दिलास . लग्न
हे एक बंधन आहे , त्यात तू अडकली आहेस .पण तुझ मन अजूनही
प्रेमासाठी आसुसलेल आहे शारीरिक नाही तर मानसिक . मी ठरवलं होत
कि तुला काही reply द्यायचा नाही . या आधी मी बर्याच जणांना अस
सांगतल होत पण कोणी मला reply केला नाही . खोटारडी म्हणून माझा
अपमान केला . पण कोणी माझ्या मनात उतरून बघितलं नाही कि मी
का अस वागते ? पण तू मात्र बरोबर ओळखलस . मनकवडा आहेस कि काय
रे ? पूर्ण जिंकलस रे मला तू पूर्ण जिंकलस . ठरवलं , कि तुला
सर्व सांगायचं .
College मध्ये असताना विवेकशी प्रेम झाल . जातीच्या
कारणामुळे पळून जून कोर्टात लग्न केल . विवेक oberoy च्या
‘साथिया ’ फिल्म सारख शेवटी घरी कळल्यावर आम्ही gajiyaabadla
flat घेऊन राहायला लागलो . सुरुवातीचे दिवस खूप सुखात गेले
.विवेकाने फक्त चंद्र तारे तोडून ते माझ्यावर उधळायचे बाकी
ठेवले होते . इतके सुख त्याने मला दिले . पण काही दिवसातच
ग्रहणाचे काळे ढग आकाशात दिसायला लागले ते माझ्या सासुबाइन्च्या
रूपाने . तिला मी सून म्हणून मान्य नव्हते .पण विवेकसमोर त्या
काही बोलायच्या नाही . पण तो office ला गेल्यावर मात्र बारा तास
मला टोमणे सहन करायला लागायचे . तो थकून यायचा म्हणून मी त्याला
काही न सांगता सहन करत होते . पण एकदा सहन करण्याची क्षमता
संपली आणि त्याला सर्व काही सांगितलं . आश्चर्य म्हणजे त्याने
त्याच्या आईची बाजू घेतली . Tevhaa मी 2 महिन्यांची pregnant होते
. भांडणामध्ये त्याने मला ढकललं आणि मी kitchen च्या ओट्यावर
पोटाशी पडले . हा माझा पहिला miscourage. सासूबाई सर्व बघत
होत्या पण काही बोलल्या नाही . त्यानंतरही एका वर्षाने असाच झाल
तेव्हा मी जमिनीवर पडले तो दुसरा miscourage . मला काही कळायचं
नाही कि काय कराव आई वडिलांकडे जायला तोंड नव्हत .सर्काशिताल्या
वाघासारखी माझी अवस्था झाली होती . नंतर मी काही बोलायचे नाही
.सासूबाई lucknow ला निघून गेल्या आणि सर्व त्रास कमी झाला . पण
विवेकबद्दल असलेल प्रेम कितीतरी पटींनी कमी झाल . ज्या मुलासाठी
मी स्वतःच्या आई वडिलांचा विचार न करता घरातून पळून आले .
त्याने माझा जराही विचार karu नये ? दिवसभर घरात बसून कंटाळा
यायचा मग time pass म्हणून orkut वर एक fake account उघडल आणि
सहज म्हणून मुलांसोबत time pass करायचा मजा यायची सर्वांना
छाल्ताना , मी chat करताना त्यांची उत्सुकता अगदी शिगेला
पोहोचायची खूप खेळायचे त्यांच्या मनाशी , आणि मग कंटाळा आला कि
त्याला सांगायचं माझ लग्न झाल आहे . तो मुलगा आपोआप बोलायचं
बंद करायचा .पण तू तास काही केल नाहीस . बाकीच्यांना कलाल कि
माझ लग्न झालेलं आहे ,तर कधी मला विचारायचे नाही कि तो कसा
आहे ? काय करतो ? पण तू मात्र मला त्याच्याविषयी सर्व विचारलास
मलाही तुझ्यापासून काहीही लपवता आल नाही .जी गोष्ट मी आजपर्यंत
माझ्या मित्र -मैत्रीणीना आई -वडिलांना देखील नाही सांगितली
तइ सर्व तुला सांगितली तुझ्याशी बोलताना वेळ कसा निघून
जायचा कळायचं सुद्धा नाही .
त्या दिवशी पहिल्यांदा तू call केलास , पहिल्यांदा मी
तुझा आवाज ऐकत होते .तुझ्या बोलण्याकडे maaz लक्षच नव्हत , तुझी
मधाळ वाणी , बोलण्यातला आदब्शिर्पना , नम्रता यातच मी गुंग झाले .
गमतीने तुला विचारलं कि तू गायक आहेस का ? माझ्या सात
पिड्यांपासून एकही गायक आमच्या घरात जन्मला नाही हे तुझ उत्तर
, मग chatting करतानाही तुझा आवाज ऐकत आहे अस वाटायचं . 3 महिने
झाले आपल्या मैत्रीला मी तुझे सर्व उपदेश पाळण्याचा प्रयत्न करत
होते . दर मंगळवारी तू माझ्यासाठी प्रार्थना करायचास , स्वतःसाठी
का नाही मागितलास रे ? का आम्हालाच भरभरून दिल ? तू नेहमी
म्हणायचास कि everything will be all right देव सर्व काही ठीक
करेल . तो माझी प्रार्थना जरूर पूर्ण करेन .
विवेक आणि मी काही दिवसांसाठी जेव्हा दिल्लीला गेलो
तेव्हा तुझ्याशी नित बोलताच आल नाही . कधी जाव तुझ्याशी बोलते
अस वाटत होत . पाच दिवसांनी गाजीयाबाडला आलो , मी सतत विवेक
च्या office मध्ये जाण्याची वाट बघत होते . त्याने जसा घराच्या
बाहेर पाय ठेवला तसच विजेच्या वेगाने येऊन कॉम्पुटर चालू केला
आणि आश्चर्याचा धाक्का बसला तुझा एकही scrap नव्हता . तुला call
करण्याचा प्रयत्न केला पण तोही लागत नव्हता मी खूप वेळ विचार
केला मग म्हटलं मी इथे नसल्याने तू scrap केला नसशील .तुला
scrap पाठवले SMS केले पण काही उत्तर मिळाले नाही .एवढा राग
येतो तुला माहित नव्हत कारण गेल्या 3 महिन्यात एकदाही रागावला
नाहीस आणि आज मात्र एकदम नातच तोडून टाकल्यासारख वागत होतास .
2 दिवस मी वाट बघितली कॉम्पुटर समोर बसून .तुझ्या online
येण्याची vaat बघत होते पण तू online आला नाहीस . तुझा एकही
reply आला नाही . मग मात्र खूप बावरले काय घडल काहीच काळात
नव्हत . अचानक आठवण आली कि email च account open करून बघाव .
त्यात तुझा mail बघितला आणि अधाशासारखी वाचायला सुरुवात केली
Dear मेघा ,
माझ्या आयुष्यातले सर्वात चांगले क्षण मी
तुझ्यासोबत घालवले . हे क्षण मी माझ्या मनाच्या कप्प्यात बंदिस्त
करून ठेवले आहेत . ते फक्त माझे आहेत . त्याच्यावर कुणाचा हक़्क़
नाही . आता मी जे काही तुला सांगणार आहे त्यावर कदाचित तुझा
विश्वास बसणार नाही . पण दुर्दैवाने हे सर्व खर आहे . मी
engineering student आहे ,मुंबईला राहतो हे सर्व खर आहे .पण मी
कुठलाही part time job करत नाही , माझे वडील watchman नाहीत , आई
दुसर्यांच्या घरी धुनी भांडी करत नाही . तू जस मला सांगितलं
होतास कि तू अविवाहित आहेस तसच मी तुझ्याशी खोत बोललो यासाठी
मला माफ कर . I am really sorry for that.माझे वडील import- export
चा buisiness कटात , आई cardiologist आहे . एक वर्षापासून मला blood
cancer आहे , आणि तुला माहीतच असेल कि यावर काही इलाज नाही .
माझंही तेच झाल आहे .orkut वरच्या कुठल्याही मित्राला मैत्रिणीला
हे माहित नाही . तुझ्याप्रमाणे माझाही हे fake account आहे आणि
यातले सगळे मित्र अनोळखी आहेत . पण तुझ्याशी मैत्री पलीकडच नात
निर्माण झाल त्यामुळे तुझ्यापासून मी काहीही लपाउ शकत नाही
.जेव्हा मी तुला सांगायचो कि मी job ला जातोय तेव्हा मी
आईबरोबर दवाखान्यात जायचो . तिने प्रक्टीचे बंद केली आणि पूर्ण
वेळ मला देते माझ्या देखभालीसाठी . ज्या दिवशी मला cancer असल्याच
कलाल त्या दिवशी दोघांवरही आभाळ कोसळल . आमच्या हसत्या खेळत्या
घराला कोणाचीतरी नजर लागल्यासारख झाल . खूप इलाज केले पण काही
झाल नाही , मंत्र -तंत्र , उपास -तपास , नवस सर्व काही झाल पण काही
उपयोग झाला नाही . माझ्या खूप जवळच्या मित्रांनाच हे माहित आहे
.मला कॉलेज मध्ये जायला बंदी केली म्हणून मीही घरीच orkut वर
नवीन friend बनवन त्यांच्याशी गप्पा मारणे यात वेळ घालवायला
लागलो . तू ज्या दिवशी मला mail केला कि , I want to do sex with
you तेव्हाच मला कलाल कि काहीतरी प्रोब्लेम नक्कीच आहे आणि तूच
मला खर काय ते सांगशील आणि तसच घडल . त्या दिवसापासून दररोज
बाप्पाजवळ प्रार्थना करायचो कि सर्व काही ठीक होऊ दे . तुझ्या
miscorage बद्दल वाचून तर अंगावर काटाच आला .doctor ने तुला
सांगितलं होत कि परत तू conceive नाही करू शकणार पण माझा
देवावर पूर्ण विश्वास होता दर मंगळवारी बाप्पाकडे तुझ्यासाठी
प्रार्थना करायचो .
तू दिल्लीला जात आहेस पण मला मात्र करमणार
नाही आणि आजकाल मलापण त्रास खूप होतोय . आई जास्त वेळ कॉम्पुटर
समोर बसू देत नाही . म्हणून तुला सर्व काही सांगतोय ,काही
दिवसांनी कदाचित मी या जगात नसेन पण देवाजवळ एवढीच प्रार्थना
करतो कि , तू कुठेही राहा पण सुखात राहा . विवेकच तुझ्यावरच
प्रेम कधीच कमी होऊ नये आणि तुझ त्याच्यावार्चाही . जर तुम्ही
दोघे मानाने एकत्र आले तर सर्वात जास्त आनंद मलाच होईल , आणि
मला माहित आहे कि हे लवकरच होईल , आणि तुझ्या pregnancy चा एक
mail माझ्या inbox मध्ये पडला असेल . काय माहित मी असेन का नसेन
…..एक प्रार्थना जरूर करेन माझ्यासाठी कि जर मी या जगातून गेलो
तरी पुनर्जन्म घेऊन तुझ आणि विवेकच बाल म्हणून या जगात परत
पाउल ठेवेन . सर्व काही ठीक होईल ,देवावर विश्वास ठेव आणि हो
काळजी ghe स्वतःची ,विवेकाची आणि होणार्या बाळाची .
फक्त तुझाच मनापासून (मनु )
Mail वाचून एकदम shock झाले . मन अगदी सुन्न
झाले .सुमती क्षेत्रामाडेंची ‘युगंधरा ’ वाचल्यानंतर झाल अगदी
तसं .तुला call करायचा प्रयत्न केला , पण
तुमसे मिलके ऐसा लागा
तुमसे मिलके
आरमा हुये पुरे दिलके
ऐ मेरी जाने वफा
तेरी मेरी मेरी तेरी
एक जान हैं
साथ तेरे रहेंगे सदा ……..
हि callertune नुसतीच वाजत राहिली ,रोज तुला SMS, scrap करते
पण उत्तर कधीच येत नाही .आज 3 महिन्यांनी तुला mail करते आहे
.खरच तुझ्या प्रार्थनेत खूप शक्ती आहे ,ज्या ठिकाणी डॉक्टरांनी
आशा सोडली होती तिथे तुझ्या प्रार्थनेमुळे चमत्कार घडला . आज
तुला सांगावास वाटत कि मी pregnant आहे . जेव्हा विवेकला कळल
तेव्हा त्याने मला उचलून गिरकीच घेतली पण मला तू हवा होतास
त्या ठिकाणी . काय माहित का पण तू सांगितल्याप्रमाणे मी
त्याच्याशी चांगल वागतेय आणि तोही खूप चांगला वागतोय माझ्याशी .
खूप काळजी घेतोय माझी . तू स्वतःसाठी का नाही प्रार्थना केलीस
…..का नाही ? माझ्या पोटात वाढणार बाल तुझ्या रूपात नाही याव
हीच प्रार्थना देवाजवळ करते . माझ आयुष्य तुला लाभू दे
……..मनापासून फक्त तुलाच
मेघना